भुसावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष सर्वांत महत्वाच्या मुद्दयांना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? आंदोलात्मक भुमिका घेणार निळे निशाण संघटनेचा इशारा.

भुसावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकारण होण्याकरिता.निळे निशाण संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले होते.गेल्या वर्षभरापासून शासन प्रशासनांना वारंवार निळे निशाण संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहेत तरी देखील सर्वसामान्य जनतेच्या समस्याचे निराकरण होत नसल्याचे दिसून येत आहे . या सर्वांत महत्वाच्या मुद्दयांना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?- आंदोलात्मक भुमिका घेणार निळे निशाण संघटनेचा इशारा
संघटनेमार्फत सर्वसामान्य जनतेचे विषय खालीलप्रमाणे काय आहे जाणून घेऊया.
१)भुसावळ शहरातील सर्वसामान्य जनते करिता ट्रामा सेंटर (शासकीय रुग्णालय) व नगरपालिका शासकीय रुग्णालय असून त्या रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात यावे तसेच गर्भवती महिलांची प्रसूती दरम्यान शस्त्रक्रिया (सिझर) करण्याची आवश्यकता असल्यास तात्काळ व्यवस्था करण्यात यावी.
२) भुसावळ शहरात नाहाटा कॉलेज ,आठवडे बाजार, बस स्टॅन्ड ,यावल नाका या परिसरात तात्काळ महिलांकरिता स्वच्छतागृह उभारण्यात यावे.
३) तालुक्यातील विधवा, परीतक्ता ,घटस्फोटीत, अंध ,अपंग व निराधार व्यक्तींना अन्नसुरक्षा योजनेच्या यादीत तात्काळ समाविष्ट करण्यात यावे.
४) तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या खाजगी कंपनीत तसेच वीज निर्मिती केंद्र भुसावळ येथे पर प्रांतातून पोट भरण्यास आलेल्या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांची कंत्राटदार यांच्याकडून होत असलेली पिळवणूक थांबवून खाजगी कंपन्या व वीज निर्मिती केंद्र दीपनगर या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यावा.
५) महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात अनेक बेघर भूमिहीन गरजू पात्र लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही तरी त्याची चौकशी करून नगरपालिका क्षेत्रात अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या बेघर भूमिहीनांना जागेसह प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा.
६) नगरपालिका हद्दीत व ग्रामीण भागात काही स्वार्थी व्यक्तींनी महसूल विभागाची दिशाभूल करून शासनाच्या नियम अटींचे उल्लंघन करून कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा लाईट , गटारी , रस्ते न करून देता प्लॉट विक्री केली आहे त्या अनुषंगाने प्लॉट विक्री करणाऱ्यांवर शासनाची दिशाभूल करून सर्वसामान्यांची पिळवणूक केल्याप्रकरणी कारवाई करून वैयक्तिक स्वार्थापोटी शासनाची दिशाभूल करून प्लॉट विक्री करणाऱ्यांना विक्री केलेल्या लेआउट मध्ये रस्ते व गटारी बांधून देण्याचे आदेश निर्गमित करावे.
७) भुसावळ शहरात डि .एस .विद्यालय प्रांगणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले परंतु आज पावेतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचे फलक लावण्यात आले नाही तरी दि.२०/०८/२०२५ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक तसेच आर.पी.डी रोडला डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नावाचे फलक लावण्यात यावे हि नम्र विनंती अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी . असा इशारा देखील 
उपस्थित कार्यकर्ते जिल्हाध्यक्षा नंदाताई भावटे , भुसावळ शहराध्यक्षा वंदना चव्हाण , भुसावळ तालुका अध्यक्षा निर्मला सुरवाडे व निकीता भावटे यांनी दिला.
   
  

0/Post a Comment/Comments