बिहार राज्यातिल बौद्धगया महाबोधी बौद्ध विहार ज्याच्यावर अनेक मनुवादी ब्राम्हणांनी ताबा करून घेतलेला आहे तरी बौद्धगया महाबोधी विहार त्यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध भिक्षुकांच्या स्वाधीन करावे . या करिता आज दि . १५ मे २०२५ रोजी निळे निशाण संघटना रावेर तालुका कार्यकारणीच्या वतिने छोरीया मार्केट रावेर येथुन डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते तहसिलदार कार्यालय रावेर पर्यंत मोर्चा काढण्यात आला व नायब तहसीलदार पाटील यांना निवेदण देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे जळगांव जिल्हा उपप्रमुख सदाशिव निकम , फैजपुर विभाग प्रमुख , विलास तायडे , लक्ष्मीताई मेढे , रावेर तालुका अध्यक्ष नारायण सवर्णे , उज्वला वाघ , विजय धनगर , सुनंदा रायमळे , अल्काताई जाधव , चंबाबाई अवसरमल , सयाबाई इंगळे , मंदाताई ठाकणे , कविता शिंदे , विशाल तायडे , उदय वाघ , लक्ष्मण गोमटे तसेच इतर असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा