औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर भुसावळ येथील एक ठेकेदार व कॉसमॉस को - ऑप बँक भुसावळ यांच्या संगनमताने असंघटीत कंत्राटी कामगारांचे होत आहे आर्थिक व मानसिक शोषण - निळे निशाण संघटनेने केली कारवाईची मागणी

औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर भुसावळ येथील एक ठेकेदार व कॉसमॉस को - ऑप बँक भुसावळ यांच्या संगनमताने असंघटीत कंत्राटी कामगारांचे होत आहे आर्थिक व मानसिक शोषण - निळे निशाण संघटनेने केली कारवाईची मागणी 

दि . ११ मे २०२५ रोजी दिपनगर भुसावळ येथील कार्यरत असलेल्या असंघटीत कत्रांटी कामगारांच्या समस्यांच्या संदर्भात दिनांक ११ मे २०२५ रोजी निळे निशान संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेच्या जळगाव जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे व जळगाव जिल्हा प्रवक्ता ॲडव्होकेट प्रिया अडकमोल यांच्या उपस्थितीत दीपनगर येथील कंत्राटी कामगारांच्या समस्या संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत दिपनगर येथील एस पी इंटरप्रायजेस व कॉसमॉस को - ऑप बँक भुसावळ यांच्या मनमानी व गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्याप्रसंगी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की दिपनगर येथील हुकुमशाही करणारा ठेकेदार व कॉसमॉस बँक भुसावळ यांनी संगनमताने केलेला आर्थिक घोळ उघडकीस आणल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही त्याप्रसंगी संघटनेच्या कामगार व शिक्षण विभागाच्या अध्यक्षा निकिता भावटे , भुसावळ युवक तालुका अध्यक्ष दीपक लोहार , रवी बाविस्कर , गणेश बर्कले , विशाल सुरवाडे , मोहम्मद शोएब व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments